नाशिक: कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सुक्ष्म नियोजन करावे- डॉ.प्रवीण गेडाम

नाशिक। दि. ७ नाव्हेंबर २०२५: आगामी सिंहस्थ कुंभमेळयात पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्यने भाविक उपस्थित राहणार आहेत. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यासह पायी येणारे भाविक, त्यांना इच्छीत स्थळी पोहचण्याची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियोजन व अनुषंगिक बाबी याबाबत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मत-मतांतरे जाणून घेत साधक बाधक चर्चा झाली. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

विभागीय आयुक्त गेडाम म्हणाले की, प्रमुख पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार या मार्गांनी येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या गृहित धरून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळाच्या धर्तीवर केलेले नियोजनाचा आधार घेत स्थानिक पातळीवरील अत्यावश्यक बाबी लक्षात घेवून नियोजन करावे लागेल. गर्दीचे नियोजन करतांना टप्प्याटप्यावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजनाची उपलब्धता, आरोग्य सुविधांसह आवश्यक सोयी-सुविधा यास विशेष प्राधान्य देण्यात यावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना अटक !

यावेळी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा धर्तीवर तयार करण्यात आलेल्या पर्वणी काळातील नियोजनाचे महानगरपालिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पोलीस, महापालिका आदी विभागांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. यावर उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी यांनी आपल्या सुचना मांडल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790