नाशिक। दि. ३१ ऑक्टोबर २०२५: नाशिक शहरासह जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गुरुवारी (दि. ३०) शहरात ३ मिलिमीटर पाऊस झाला, तर बागलाण तालुक्यात तब्बल ३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
आज (दि. ३१) नाशिकमध्ये किमान तापमान १९.२ डिग्री सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. येत्या दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज असून नंतर थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
देशात चार भागांत चक्रीवादळे असून त्यांचा स्थानिक ठिकाणी प्रभाव आहे. पंरतू सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणीच पावसाची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने दिवसभर पावसाचे वातावरण तयार झाले होते. मात्र अकरा वाजेनंतर सूर्यप्रकाश पडल्याने नागरिकांना पावसापासून दिलासा मिळाला होता. परंतु अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान हे २६.१ अंश सेल्सिअसवर होते. त्यामुळे दिवसभर गारवा जाणवत होता.
![]()

