नाशिक। दि. २५ ऑक्टोबर २०२५: ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ कारवाईप्रमाणेच बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी नागरिकांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली आहे.
त्याची दखल घेत शनिवारी (दि. २५) ऑटो रिक्षा शिस्त मोहिम राबवण्यात येणार आहे. मोहिमेत, चालकांनी निर्धारीत युनिफार्म परिधान करणे, आरटीओ बॅच लावणे या बाबींचे उल्लंघन केल्यास व धोकेदायक रिक्षा चालवताना आढळल्यास रिक्षा जप्त करत स्क्रॅप करण्यात येईल तसेच फौजदारी कारवाई केली जाईल.
या ठिकाणी मोहीम:
गंगापूररोड, कॉलेजरोड, मुंबईनाका, आरके, त्र्यंबकनाका, अशोकस्तंभ, शालिमार, सीबीएस, सिटी सेंटर मॉल, आनंदवल्ली, सारडा सर्कल, राजदूत हॉटेल, कॅनडा कॉर्नर, मालेगाव स्टँड, पेठनाका, दिंडोरीनाका, पंचवटी कारंजा, मखमलाबादनाका, रामकुंड, संतोष टी पॉइंट, छत्रपती संभाजीनगरनाका, नांदूरनाका, जत्रा हॉटेल, अमृतधाम, जेलरोड, बिटको, रेल्वे स्टेशन, सुभाषरोड, मुक्तिधाम, उपनगरनाका, दत्तमंदिर सिग्नल, बिटको कॉलेज, द्वारका, त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, सातपूर, श्रमिकनगर, पपया नर्सरी, एक्स्लो पॉइंट, फाळके स्मारक, गरवारे पॉइंट, लेखानगर, भगूर, देवळालीगाव, कॅम्प, संसरी.
![]()

