नाशिक | १९ ऑक्टोबर २०२५: नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे युवक खाली पडल्याची भीषण घटना शनिवारी रात्री घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून रकसोल (बिहार)कडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकातून न थांबता पुढे गेल्यानंतर ही दुर्घटना झाली. ओढा स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती रेल्वे व स्थानिक पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, ढिकले नगर परिसरातील पटरीवर दोन मृतदेह आणि एक गंभीर जखमी युवक आढळला. जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने गाडीच्या दारात किंवा छतावरून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
![]()

