पुणे। दि. १४ ऑक्टोबर २०२५: इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दोन्ही परीक्षांच्या तारखा सोमवारी जाहीर करण्यात आल्या.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षाही याच कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाईल. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्य शास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच कालावधीत घेतल्या जाणार आहेत. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790