नाशिक। दि. १२ ऑक्टोबर २०२५: शेअर्स ट्रेडिंग लिंक पाठवून ऑनलाइन ट्रेडिंग करण्यास भाग पाडत ४ गुंतवणूकदारांना १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका व्यावसायिकाला मोबाइलवर लिंक आली. प्रिया देसाई, आनंद भाटिया या दोघांनी लर्निंग सर्कल ग्रुप आणि व्हीआयपी सर्व्हिस ग्रुपमध्ये अॅड केले. ग्रुपवर शेअर्स ट्रेडिंग करण्याची माहिती दिली. लिंक पाठवली. स्टॉक, आयपीओमध्ये जादा रिटर्न मिळत असल्याचे भासवत विविध बँक खात्यात ३७लाख ८४ हजार भरण्यास सांगितले. नाशिकरोडच्या एका तक्रारदाराने १० लाख ९६ हजार, दुसऱ्याने २७ लाख ७० हजारांची रक्कम गुंतवली. नफा झालेली रक्कम काढण्यास सांगितले असता संशयितांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे समजले. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे तपास करत आहेत.
चौथ्या घटनेत याच संशयितांनी व्हीआयपी क्लब ग्रुपमध्ये अॅड करून लिंक ओपन करण्यास भाग पाडले. स्टॉक मार्केट, आयपीओचे बनावट चांगले रिटर्न येण्याचे भासवत विविध बँक खात्यात ३४ लाख ५९ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
![]()

