नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२५: गत पंधरा दिवसांपासून एकाच जागेवर खिळलेल्या मान्सूनने शुक्रवारी (दि.१०) परतीच्या प्रवासास पुन्हा सुरवात करून महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. येत्या ३ ते ४ दिवसांदरम्यान तो महाराष्ट्राबाहेर पडण्याची वातावरणीय शक्यता असून देशातून सरासरी १५ ऑक्टोबरला तो बाहेर पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी त्याची सीमारेषा कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व विदर्भातील अकोला तसेच इतर राज्यातील जबलपूर, वाराणसीतून जात असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790