नाशिक महापालिकेने शहरातील १८ अवैध होर्डिंग्ज, ११ जाहिरातींचे फलक काढले

नाशिक। दि. ७ ऑक्टोबर २०२५: नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातील सहाही विभागात अनधिकृत फलक, होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १८ अवैध होर्डिंग, ११ जाहिराती फलक आणि ९ स्टँड बोर्ड काढण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वरला प्रवेश खुला; प्रवेश शुल्क रद्द करण्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय !

महापालिकेच्या वतीने आता परवानगीशिवाय फलक, होर्डिंग किंवा जाहिराती लावणाऱ्यांवर थेट पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ठिकठिकाणी परवानगीशिवाय फलक उभारले जात असल्याने शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

⚡ हे ही वाचा:  पंचवटीत ५२ फटाके गाळ्यांचा लिलाव; १२ स्टॉल्ससाठी आज बोली

त्यामुळे मनपाच्यावतीने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. मनपाच्या पथकाने कारवाईदरम्यान सर्व साहित्य जप्त केले. पुढील काळात अवैध जाहिरात लावणाऱ्यांवर केवळ दंड नव्हे, तर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. फलकांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790