नाशिक। दि. ०४ ऑक्टोबर २०२५: दसऱ्याच्या दिवशी पहाटे दुचाकीवर आलेल्या तिघांनी पाच वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे देवळालीगाव मालधक्कारोड भागातील तिघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दुचाकी व धारदार कोयता जप्त केला आहे.
गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तिघांनी वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. देवळाली गाव येथेही कारची काच फोडून नुकसान केले होते.
काचा फोडल्याची कबुली:
तिघा अल्पवयीन मुलांचा रात्री एका मुलासोबत वाद झाल्यानंतर तो मुलगा उपचारासाठी दवाखान्यात गेला होता. त्यानंतर हे तिघे दुचाकीवरून फिरत असताना गुरुवारी पहाटे त्यांनी धारदार कोयत्याच्या मदतीने पाच गाड्यांच्या काचा फोडल्याची कबुली दिली. तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून धारदार कोयता व मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
![]()

