
नाशिक। दि. ३० सप्टेंबर २०२५ : नाशिक गुन्हेशाखा युनिट-१ ने हॉटेल स्वागत (व्दारका सर्कल) येथे सापळा रचून अवैध एमडी (मेफेड्रॉन) विक्रीचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत संशयित मुज्जफार उर्फ मुज्जु शेख याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, ३० ग्रॅम एमडीसह तब्बल १७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हेशाखा युनिट-१ चे हवालदार प्रविण वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेल स्वागत येथे सायंकाळी सापळा लावला. या वेळी संशयित १) मुज्या उर्फ मुज्जफर मैनूद्दीन शेख (४३, रा. भोईवाडा कथडा, भद्रकाली), २) शेख फरहान रज्जा मोहमद सादिक (२२, रा. बागवानपुरा, भद्रकाली), ३) अनिल मोतीराम वर्मा (३२, रा. तपोवन, पंचवटी) आणि ४) हिना जीवन कापसे (३५, रा. निलगीरीबाग) हे ३० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी संशयितांकडून ४.५ लाख रुपये किमतीचा एमडी, चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण १७ लाख १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपाआयुक्त (गुन्हे) रणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. श्री अंचल मुदगल, गुन्हे शाखा युनिट १, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, किरण शिरसाठ, सुदाम सांगळे, हवालदार प्रविण वाघमारे, संदीप भांड, विशाल काठे, प्रदीप मसदे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, उत्तम पवार, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलींद परदेशी, शर्मिला कोकणी, पोअंम राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मनिषा सरोदे, चालक पोहवा नाजीम पठाण यांच्या पथकाने केली.
![]()

