नाशिक (प्रतिनिधी) : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोघांवर तलवारीने वार केल्याची घटना शनिवारी (दि.03) दुपारच्या सुमारास घडली.
देवळाली गावातील रोकडोबावाडी येथे राहणाऱ्या अक्षय वाल्मिकी याने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो नदीवर जात असतांना रोकडोबावाडी पुलाजवळ साहिल महाकाली आणि शुभम बेनवाल हे दोघेजण मोटारसायकलवरून अक्षयकडे आले. अक्षयकडे दारू पिण्यासाठी त्यांन पाचशे रुपयांची मागणी केली. अक्षयने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्या दोघांनी अक्षयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अक्षय तेथून निघून जात असतांना साहिलने त्याला मागून वीत फेकून मारली. त्यानंतर साहिल आणि शुभमने गाडीला लावलेली तलवार काढून अक्षयच्या डोक्यात उलटी मारून अक्षयला जखमी केले. यावेळी अक्षयचा भाऊ मध्ये पडला म्हणून त्याच्यावरसुद्धा उलट्या तलवारीने वार केला. याप्रकाराणाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.