नाशिक: २.५६ लाखांचा प्रतिबंधित व मुदतबाह्य सिगारेटचा साठा जप्त !

नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२५: प्रतिबंधित असलेल्या सिगारेटचा साठा करणाऱ्या गोदामावर छापा टाकण्यात आला. कारवाईत २ लाख ५६ हजारांचा प्रतिबंधित व मुदतबाह्य सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला.

मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने विघ्नहर ट्रेडर्स स्वामी, विवेकानंदनगर येथे ही कारवाई केली. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित सुनील मुसळे यास ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मिशन ग्रीन मान्सून उपक्रमांसाठी सरसावले नाशिककर ! ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप

पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण माळी, विश्वास चव्हाणके यांना माहिती मिळाली. एक विक्रेता बनावट प्रतिबंध वैज्ञानिक इशारा नसलेले मुदतबाह्य सिगारेटची साठवणूक करत असल्याचे समजले. पथकाचे शेरखान पठाण, किशोर देसले, गणेश वाघ यांच्या पथकाने छापा मारत गोदामातून साठा जप्त केला. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६५७/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790