नाशिक। दि. २६ सप्टेंबर २०२५: जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. २७) पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषणकुमार गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सीबीएसकडील वाहतूक वळविली आहे. मेहेर सिग्नलपासून पुढे वाहनांना दुतर्फा प्रवेश बंद राहणार आहे.
जिल्हा न्यायालयाची नूतन इमारत उभारणी पूर्ण झाली आहे. या इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजेरी लावणार आहेत. सुरक्षित व सुरळीत वाहतूक नियोजनाकरिता व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सीबीएस परिसरात मेहेर सिग्नल तसेच टिळकवाडी सिग्नलकडून दोन्ही बाजूने येणारी वाहतूक शनिवारी बंद राहणार आहे. टिळकवाडी सिग्नलकडून कवायत मैदानासमोरून सीबीएस सिग्नलकडे वाहनचालकांना ये-जा करता येणार नाही. सकाळी ९ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
‘प्रवेश बंद’ मार्ग:
👉 सिबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल पावेतो दोन्हीबाजुने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
👉 टिळकवाडी सिग्नल ते सिबीएस सिग्नल पावेतो दोन्हीबाजुने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
‘पर्यायी मार्ग’ असे:
👉 शालीमार कडुन सिबीएस, मेहेर, अशोकस्तंभा कडे जाणारी वाहतुक ही शालीमार, दिपसन्स कॉर्नर, सांगली बँक सिग्नल, एम.जी. रोड, मेहर सिग्नल उजवीकडे वळुन इतरत्र जातील.
👉 गडकरी सिग्नल कडुन सिबीएस कडे येणारी वाहतुक ही मोडक सिग्नल, राजदुत हॉटेल जलतरण तलाव सिग्नल, भवानी सर्कल मार्गे इतरत्र जातील.
👉 कॅनडा कॉर्नर कडुन सिबीएस कडे येणारी वाहतुक ही राणे डेअरी, टिळकवाडी सिग्नल, रामायण बंगला, जलतरण सिग्नल मार्गे इतरत्र जातील.
👉 सिबीएस कडुन टिळकवाडीकडे जाणारी वाहतुक ही सिबीएस सिग्नल, मोडक सिग्नल (त्रंबक नाका), राजदुत हॉटेल, जलतरण सिग्नल मार्गे इतरत्र जातील.
👉 जलतरण सिग्नल, रामायण बंगला टिळकवाडी कडुन सिबीएस कडे जाणारी वाहतुक ही जलतरण सिग्नल, रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, राजीवगांधी भवन, राणे डेअरी मार्गे इतरत्र जातील.
![]()

