नाशिक। दि. २० सप्टेंबर २०२५: येत्या सप्तशृंगी गड यात्रा उत्सवासाठी नाशिक विभागीय एस.टी. महामंडळाने विशेष बससेवेची सोय केली आहे. २१ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत यात्रेकरूंकरिता नाशिकसह विविध ठिकाणांहून गडाकडे अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
यात्रेच्या कालावधीत एकूण ३२० अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिकमधून सर्वाधिक १२० बसेस सोडण्यात येणार असून प्रवाशांना दर ५ मिनीटांनी एक बस उपलब्ध असेल. यामध्ये प्रवाशांसाठी विशेष भाडे निश्चित करण्यात आले असून नाशिक ते गड साधारण बस भाडे १२५ रुपये व सुखसोयी बस भाडे १५५ रुपये तर मालेगाव ते गड साधारण ८५ व सुखसोयी बस १०५ रुपये असेल.
⚡ अशा धावतील बस:
नाशिक ते सप्तशृंगी गड: १२० बस
मालेगाव ते सप्तशृंगी गड: ८० बस
मनमाड ते सप्तशृंगी गड: २५ बस
चांदवड ते सप्तशृंगी गड: १५ बस
सटाणा ते सप्तशृंगी गड: ७० बस
नांदगाव ते सप्तशृंगी गड: १० बस
![]()

