News

नाशिक: त्र्यंबकरोडवर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२५: त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरीजवळ गुरुवारी (दि. १८) दुपारी १२ वाजता एका डंपरने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार दशरथसिंग मनोहरसिंग राजावत (वय: ७१, राहणार: गंगापूर रोड, नाशिक) यांचा मृत्यू झाला. राजावत हे अंबड येथून पपया नर्सरीमार्गे दुचाकीने (एमएच १५ जीयू ५४६३) घराकडे परतत होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत तब्बल १.३५ लाख रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त

यावेळी नाशिक महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपरने (क्रमांक: एमएच १५: एचएच ७८४५) राजावत यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात राजावत डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २९४/२०२५)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here