News

नाशिक शहरातील ‘या’ भागांत शनिवारी (दि. २०) वीजपुरवठा बंद राहणार !

नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२५: महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी महापारेषण च्या १३२ केव्ही टाकळी सबस्टेशन मध्ये ३३ केव्ही एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्याचे अत्यावश्यक काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. २० सप्टेंबर) रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ च्या दरम्यान खालील वाहिनीवरील भागांचा विद्युत पुरवठा टप्याटप्याने अथवा विद्युत भार विभागला न गेल्यास पूर्ण काळ बंद राहण्याची शक्यता आहे.

यामध्ये टाकळी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या ११केव्ही उत्तरा नगर, टाकळी, शंकर नगर, पूना रोड, औद्योगिक, मुंबई रोड, सारडा सर्कल, गोदावरी आणि जुने नासिक या सर्व वाहिनीवरील तपोवन रोड, टाकळी गाव, टाकळी रोड, उत्तरा नगर, शंकरनगर, द्वारका सर्कल, पुना रोड, मुंबई रोड, पखाल रोड, वडाळा रोड, रॉयल कॉलनी,अशोका मार्ग, रविशंकर मार्ग, ड्रीम सिटी, मेट्रो मॉल परिसर, बोधले नगर, बजरंगवाडी, जनरल वैद्य नगर, हॅपी होम कॉलनी, सह्याद्री हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल परिसर, बनकर चौक इत्यादी परिसराचा समावेश असणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: १५० किलो बनावट खवा, पनीर जप्त करून नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !

तसेच उपनगर विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या:
११ केव्ही गांधी नगर वाहिनीवरील:
अभिष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर, दीप नगर, विद्युत कॉलनी, सहकार कॉलनी, एन के नगर, एल आय सी सोसायटी, आंबेडकर नगर, जेके टायर जवळ, टागोर नगर, सिध्दार्थ नगर.  

⚡ हे ही वाचा:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत तब्बल १.३५ लाख रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त

११ केव्ही समता नगर वाहिनीवरील:
टाकळी रोड, समता नगर, इंद्रायणी सोसायटी, रामदास स्वामी नगर, खोडदे नगर, साळवे मला, राहुल नगर, सोनवणे बाबा चौक, शांती पार्क, फुल सुंदर, जामकर मळा, शेलार फार्म.

११ केव्ही इच्छामणी वाहिनीवरील:
पगारे मळा,अयोध्या नगर, इच्छामणी मंदिर परिसर, सिंधी कॉलनी, खोडदे नगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, शांती पार्क, श्रम नगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी, जुनी चाळ, लोखंडे मळा, तिरुपति नगर, खरजुळ मळा. 

११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीवरील:
टागोर नगर, डीजीपी नगर, रविशंकर मार्ग, वडाला शिवार, खोडे नगर व विधाते नगर.

  • ११ केव्ही  गांधीनगर एनएमसी वाहिनी. 
  • ३३ केव्ही गॅरीसन वाहिनी.
  • ११ केव्ही  अर्टीलरी वाहिनीवरील मनोहर गॉर्डन, जयभवानी रोड, जेतवन नगर, देवळाली गाव परिसर.
  • ११ केव्ही नाशिक रोड वाहिनीवरील नाशिक पुना रोड,उपनगर पोलिस स्टेशन, आय क्वार्टर, एकझिक्युटिव्ह अपार्टमेंट,स्टार झोन मॉल परिसर,बिर्ला हॉस्पिटल परिसर,दत्ता मदिर परिसर आणि आंबा सोसायटी परिसर.
⚡ हे ही वाचा:  नाशिक : भरदिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल !

सदर काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, तांत्रिक कारणामुळे जास्त वेळ लागल्यास वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागेल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here