
नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२५: गांजा विक्री करणाऱ्या इसमास नाशिक शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक करून त्याच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे.
खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व चारूदत्त निकम यांना संशयित शकिल अन्सारी हा अशोका मेडीकेअर हॉस्पीटल समोर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, नाशिक येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुरुवारी (दि. १८) अशोका मेडीकेअर हॉस्पीटल समोर, संत सावता माळी मार्ग, जय श्री नगर, इंदिरानगर जॅगींग ट्रॅक, नाशिक येथे सापळा लावला.यावेळी संशयित शकिल आरिफ अन्सारी (वय ४० वर्षे, राहणार: रूम नंबर १०, गल्ली नंबर २, रेहमत नगर, वडाळा गाव, नाशिक) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असा संलग्न असलेला गांजा (कॅनाबिस) हा अंमली पदार्थ ३४,०२० रुपये किंमतीचा एकुण १७०१ ग्रॅम वजन असलेला बेकायदेशिररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सापळा कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यात मिळुन आला.
आरोपी विरूध्द विरोधात इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यास पुढिल कारवाईकामी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत व सविता कदम यांच्या पथकाने केली.
![]()

