News

नाशिक : भरदिवसा तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल !

नाशिक | दि. १८ सप्टेंबर २०२५: पपया नर्सरी परिसरात बुधवारी दुपारी एका तरुणाचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र प्रसंगावधान राखून तरुणाने पलायन करत आपला जीव वाचवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा प्रयत्न झालेला तरुणाचे नाव तेजस धाडगे (२४, रा. मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर) असे आहे. बुधवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास तेजस हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी हिंद सोसायटीतील चहाच्या टपरीवर आला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: १५० किलो बनावट खवा, पनीर जप्त करून नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !

यावेळी गिरीश शिंगोटे (रा. सिंहस्थनगर, सिडको) हा चारचाकी वाहनासह (एमएच ०६ एएस ५५१७) चार-पाच साथीदारांसोबत तेथे आला. त्यांनी तेजसला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावला व जबरदस्तीने गाडीत बसवून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्र्यंबक रोडवरील शिव हॉस्पिटलजवळ संधी साधून तेजसने पलायन केले व थेट पपया नर्सरी पोलिस चौकी गाठली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत तब्बल १.३५ लाख रुपये किमतीचा तुपाचा साठा जप्त

तक्रारीत तेजसने नमूद केले की, संशयितांनी त्याला ठार मारण्याची धमकीही दिली. यानंतर पोलिसांनी गिरीश शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवर व त्यांच्या साथीदारांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: श्री सप्तशृंगी गड यात्रा उत्सवासाठी दर दहा मिनिटाला बस; ३२० अतिरिक्त बसेस धावणार !

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे करीत आहेत. (सातपूर पोलीस स्टेशन, गुन्हा क्र. २९१/२०२५)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here