नाशिक। १५ सप्टेंबर २०२५: एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या व्यक्तीचे कार्ड लॉक झाल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीची मदत घेणे एका ग्राहकाला महागात पडले.
पिन कोड टाकण्यास सांगत बँकेत तक्रार करण्यास पाठवून देत कार्ड काढून घेत दुसऱ्या सेंटर मध्ये कार्ड स्वॅप करत १ लाखांची रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार माउली लॉन्स येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडला. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी ४ वाजता बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. कार्ड मशीन मध्ये स्वॅप केले असता लॉक झाले. पाटील यांनी बाहेर उभा असलेल्या इसमाकडे मदत मागितली. संशयिताने मोबाइल नंबर विचारला, मशीन मधील मेनूवर गेला. पिन नंबर टाइप करण्यास सांगितला. बँकेत तक्रार करावी लागेल असे सांगून तत्काळ बँकेत संपर्क करा असे सांगून पाटील यांना पाठवून दिले. संशयिताने हात चलाखीने कार्ड काढून घेत अंबड गाव येथील एटीएम सेंटर येथून १ लाखांची रक्कम ऑनलाइन काढली.
![]()

