
नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२५: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. रविवारी (दि. १४) गुन्हे शाखा युनिट २ आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. प्रफुल्ल दिलीप कांबळे, योगेश बाळासाहेब जाधव दोघे (रा. बोल्हेगाव अहिल्यानगर) असे या संशयितांचे नावे आहे. शनिवारी गरवारे बस स्टॉपच्या मागे संतोष उर्फ छोटू काळे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाचे पवन परदेशी, अमजद पटेल, सागर परदेशी आदींच्या पथकाने मयताची संशयित पत्नी पार्वता हिची चौकशी केली. प्रफुल्ल कांबळे याच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे तिने सांगितले. पती त्रास देत असल्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
कांबळे याने त्याचे दोन मित्र नाशिकमध्ये आले. छोटू काळे यास दारु पिण्यास घेऊन जात त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती दिली. संशयित अहिल्यानगर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. पथकाने अहिल्यानगर एलसीबी पथकाच्या मदतीने दोघांना अटक केली. एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अशोक काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८३/२०२५)
![]()

