नाशिक | दि. १२ सप्टेंबर २०२५ : नाशिकमधील आघाडीची सांस्कृतिक संस्था बाबाज थिएटर्स यंदा आपला रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. १७ सप्टेंबर २००० रोजी स्थापना झालेली ही संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून संगीत, नृत्य, नाटक आणि ललित कला क्षेत्रातील शेकडो कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधून बाबाज थिएटर्स आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाच दिवसांचा भव्य सांस्कृतिक महोत्सव “रोटरी कल्चरल फेस्टिव्हल 2025” आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन प्रा. दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, सुरेश गायधनी, संजय करंजकर, प्रेरणा बेळे तसेच रोटरीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर शेवाळे, दत्तात्रय देशमुख, रमेश मेहेरे व माजी प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम :
- १३ सप्टेंबर – उत्सव नात्यांचा : झी मराठी प्रस्तुत संगीत, नृत्य आणि कलाकारांशी थेट संवाद (संयोजन – अमोल पाळेकर)
- १४ सप्टेंबर – लग जा गले : संगीतकार मदन मोहन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीतमय संध्या. गायिका सुरभी डोमणे आणि सचिन डोमणे यांचे सादरीकरण
- १५ सप्टेंबर – नाटक डोळे नसलेला अर्जुन : लेखन-दिग्दर्शन रोहित पगारे
- १६ सप्टेंबर – द गोल्डन एरा : गीता दत्त, लता मंगेशकर, आशा भोसले, रफी, किशोर कुमार आदी दिग्गजांची अमर गाणी
- १७ सप्टेंबर – रौप्यमहोत्सवी सोहळा : मान्यवरांचा सत्कार व नाटक तिरिछ (लेखक उदय प्रकाश, सादरीकरण दिल्ली मंच)
- १८ सप्टेंबर – आपली आवड : प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतील मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम
महोत्सवाचे नियोजन रोटरीयन आशा वेणूगोपाल (मुख्य संरक्षक), प्रशांत जुन्नरे (बाबाज थिएटर्स चे संस्थापक), ज्ञानेश वर्मा (महोत्सव संयोजक), अमोल पाळेकर (महोत्सव संकल्पना व संगीत संयोजन) यांचे असून रोटरीन कुणाल शर्मा (रोटरी एन्क्लेव्ह संयोजक) आर टी एन अश्विनी सरदेशमुख आणि आरटीएन दिलीप काळे (महोत्सव समन्वयक). तसेच बाबाज थिएटर्स समन्वय समितीचे कैलास पाटील, प्रीतम पावशे, प्रीतीश कुलकर्णी, शामराव केदार, जे.पी जाधव, दिलीप सिंह पाटील, राजा पाटेकर, सौ योगिता पाटील, एनसी देशपांडे, मिलिंद जोशी यांनी रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रम दररोज सायं. ६.१५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाविश्वाचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 प्रशांत जुन्नरे – 9850609062
📞 ज्ञानेश वर्मा – 960709699
![]()

