नाशिक। दि. ४ सप्टेंबर २०२५: शहर व परिसरासह घाट प्रदेशामध्येही हवामान खात्याकडून गुरुवारी (दि. ४) व शुक्रवारी (दि. ५) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात मंगळवारपासून पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गात हळूहळू वाढ केली जात आहे. शहर व परिसरात बुधवारी (दि. ३) मध्यरात्रीपासून शहरात सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात ६.३ मिमी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद झाली.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790