नाशिक: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; नाशिकच्या गुंतवणूकदाराला तब्बल १७ लाखांचा गंडा

नाशिक। दि. ३ सप्टेंबर २०२५: शेअर मार्केटमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवत एका गुंतवणूकदाराची तब्बल १७ लाख १८ हजार ६३७ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील गुंतवणूकदाराशी काही भामट्यांनी संपर्क साधला. स्वतःला नुवामा वेल्थ कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवत कंगना शर्मा, आशिष केहेर आणि त्यांच्या साथीदारांनी विविध मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. शेअर मार्केटमधील ट्रेडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी विश्वास संपादन केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

यानंतर संशयितांनी गुंतवणूकदाराला विविध बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांची रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, पाच महिने उलटूनही गुंतवणुकीची रक्कम किंवा त्यावरचा परतावा न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

या घटनेत गुंतवणूकदाराला तब्बल १७ लाख रुपयांचा फटका बसला असून प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here