नाशिक। दि. ३ सप्टेंबर २०२५: नाशिक परिसरातील नागरिकांना गावठी पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ व खंडणीविरोधी पथकाने पथकाने निळकंठेश्वर महादेव मंदिर, मानुर गाव येथे ही कारवाई केली. योगेश बाळकृष्ण चव्हाण (वय: २७, रा. शंभूराजे कॉलनी, हिरावाडी) असे या संशयिताचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाचे नितीन जगताप, दत्तात्रय चकोर यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश चव्हाण हा गावठी पिस्तूल बाळगत दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे आदींनी सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले.
अंगझडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल त्यात १ जिवंत काडतूस मिळून आले. आडगाव पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितावर पंचवटी पोलिस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, गुन्हेशाखा युनिट कमांक १ कडील पोलीस उपनिरीक्षक: चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार रमेश कोळी, रविंद्र आढाव, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप व चालक पोलीस हवालदार सुकाम पवार तसेच खंडणी विरोधी पथकाकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम अशांनी संयुक्तरित्या केली आहे.
![]()

