मुंबई। दि. १ सप्टेंबर २०२५: भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मधील मासिक सरासरी पाऊस दीर्घकालीन सरासरी (१६७.९ मिमी) च्या १०९ टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. बहुतांश प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिणेकडील काही ठिकाणे, उत्तर-पश्चिम भारतातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची ऑगस्ट महिनाअखेर ८८२ मिमी इतका शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे .राजस्थानच्या मध्य भागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे .दोन सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे . त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील सात दिवसात गुजरात तसेच कोकण व गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात तुफान पावसाची शक्यता आहे .दोन व तीन सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून तीन-चार व पाच सप्टेंबर रोजी कोकण व गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .
![]()

