नाशिक: क्रेडाई प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे १०० कोटींची उलाढाल; आगामी सणासुदीच्या काळातदेखील होईल अनेकांची गृहस्वप्नपूर्ती !

नाशिक। दि. १९ ऑगस्ट २०२५: क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज जरी समारोप झाला असेल तरी अनेकांसाठी ही त्यांच्या गृहस्वप्न पूर्ती ची सुरुवात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. गत 5 दिवसांपासून ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नम: नाशिक या गृहप्रदर्शनाचा आज समारोप झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर म्हाडा चे अध्यक्ष रंजन ठाकरे , क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष गौरव ठक्कर , मानद सचिव तुषार संकलेचा ,एक्स्पो चे समन्वयक ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, आय .पी. पी कृणाल पाटील, एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवंसरा, उपाध्यक्ष अनिल आहेर, उदय घुगे, शामकुमार साबळे, प्रवीण तिदमे, कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रायोजक दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स चे संचालक दिपक चंदे हे उपस्थित होते

मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिक मध्ये आगामी दोन वर्षानंतर कुंभ मेळा होत असून या कुंभ मेळ्यात देशविदेशातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी हा कुंभ मेळा स्मरणीय करण्यासाठी तसेच नाशिक ची ओळख एज्युकेशन हब म्हणून होण्यासाठी देखील आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानद सचिव तुषार संकलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले की,शहराची प्रगती व अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात.क्रेडाई सदस्य असलेला बांधकाम व्यावसायिक म्हणजे विश्वासार्ह व्यवहार अशी प्रतिमा निर्माण झाली असून प्रदर्शनाला मिळालेला उदंड प्रतिसाद ही याचीच पावती असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या मनोगतात म्हाडा चे अध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की सर्वांसाठी हक्काची घरे हे केंद्र सरकार चे उद्दिष्ट असून नियमातील त्रुटी दूर करून म्हाडा कडून सकारात्मक सहकार्य करण्याचे प्रतिपादन त्यांनीं केले.

या नंतर आपल्या मनोगतात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे गृहप्रदर्शन अनेक कारणांनी यशस्वी ठरले आहे.या प्रदर्शनास नाशिक ,उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील विविध शहरातून नागरिकांनी आवर्जून भेट दिली. या प्रदर्शनामुळे नाशिक चे ब्रॅण्डिंग होण्यास देखील मदत झाली. ग्राहकांच्या बदलत्या आवडी निवडीची झलक या प्रदर्शनात बघायला मिळाली.टाउनशिप, अॅमिनीटीज् यासोबतच मोठ्या घरांकडे असलेला नागरिकांचा कल दिसून आला .लक्झरीयस तसेच सुपर लक्झरीयस प्रकल्पांसोबतच खास जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी टाउनशिप,तसेच विविध भागातील बंगलो आणि फार्म हाऊस, प्लॉटस , ऑफिसेस व शॉप्स माहिती देखील या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळाली.प्रदर्शनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने नाशिकमधील एकूणच अर्थकारण भविष्यात सकारात्मक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परवडणाऱ्या घर साठी म्हाडाने देखील या प्रदर्शनात सहभाग घेतला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

प्रदर्शनाचा आढावा घेताना समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की प्रदर्शन कालावधीत 50 हून अधिक फ्लॅट्स आणि 50 हून अधिक प्लॉटस चे स्पॉट बुकिंग करण्यात आले .स्पॉट बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे चांदीचा शिक्का भेट देण्यात आला.तसेच अनेक साईट व्हिजीट देखील या कालावधीत झाल्या असून आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक बुकिंग होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.औद्योगिक , शैक्षणिक , धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत,त्यामुळे रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य व पोषक वातावरण असून तुलनात्मक दृष्ट्या नाशिकमध्ये रियल इस्टेटचे दर कमी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर,सुरेश पाटील , अनंत राजेगावकर,किरण चव्हाण,सुनील कोतवाल , उमेश वानखेडे ,रवी महाजन यांची देखील उपस्थिती होती. प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते आभार प्रदर्शन करतांना म्हणाले की,सर्व क्रेडाई सदस्यांनी अतिशय सकारात्मक उर्जेने प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला .त्यांच्या या सहभागाने तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रदर्शन यशस्वी झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

प्रदर्शनाचे औचित्य साधून ग्रीन कुंभ बाबत देखील चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.

उत्कृष्ट स्टॉल साठी पुरस्कार:
प्रथम: वास्तू ग्रुप
द्वितीय: ठक्कर ग्रुप लिमिटेड
तृतीय: कन्स्ट्रुवेल प्रा.लिमिटेड
चतुर्थ: स्पॅन कन्स्ट्रक्शन

प्रदर्शनास दिपक बिल्डर्स अँड डेवलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते. तसेच ललित रुंगटा ग्रुप आणि रवी महाजन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचे देखील सहकार्य लाभले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा,सहसचिव सचिन बागड,हंसराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे , अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बीरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे,सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन,समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विग समन्वयक आदित्य भातंबरेकर , सह समन्वयक अजिंक्य नाहर यांनी विशेष परिश्रम घेतले .

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here