Traffic Alert: तिसरा श्रावणी सोमवार निमित्त शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२५: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याकरिता शहर व जिल्ह्यातून शेकडो भाविक सीबीएस बसस्थानक येथून त्र्यंबकेश्वर येथे जात आहेत. बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता रविवारी (दि. १०) दुपारी २ ते सोमवारी (दि. ११) रात्री ८ पर्यंत ठक्कर बसस्थानक, तालुका पोलिस ठाणे, मेळा बसस्थानक, किशोर सुधारालय रस्त्यावर सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: फुल बाजारात युवकावर दगडाने हल्ला

प्रवेश बंद: तालुका पोलिस स्टेशन ठक्कर मार्केट येथे जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नल, किशोर सुधारालयासमोरील रस्ता जाणाऱ्या-येणाऱ्या (सिटी लिंक/ एस.टी. बस वगळता) सर्वप्रकारच्या वाहनांकरिता प्रवेश बंद राहिल.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल; जाणून घ्या सविस्तर…

पर्यायी मार्ग: तालुका पोलिस ठाणे ते ठक्कर बाजारकडे जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नलमार्गे जातील, ठक्कर बाजारकडून स सीबीएसकडे येणारी वाहतूक मोडक सिग्नल, सीबीएसमार्गे येतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790