नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२५: तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांसाठी तसेच एस.टी. बसेससाठी खंबाळे, पहिनेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांकडून सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल एस.टी. बस वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रामीण पोलिसांकडून खंबाळे आणि पहिने येथे पार्किंग व्यवस्था केली आहे. येथून पुढे जाण्यासाठी एस.टी. बसची व्यवस्था असेल. त्र्यंबकेश्वरकडे येणारी वाहने खंबाळे, पहिने, अंबोली, तळवाडे येथे थांबवली जातील. पालघरकडे जाणारी वाहने सातपूर गोवर्धनमार्गे गिरणारे, वाघेरा फाटा, अंबोली टी-पॉइंटमार्गे जव्हार-पालघरकडे जातील. घोटी वाडीव-हेमार्गे जव्हार पालघरकडे जाणारी वाहने या मार्गानेच जातील.
असा असेल बंदोबस्त:
ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल. त्यानुसार १ उपविभागीय अधिकारी, ४ निरीक्षक, १० उपनिरीक्षक, १५० अंमलदार, ५० महिला अंमलदार, १०० होमगार्ड बंदोबस्तावर असतील.