नाशिक: शहरातील ‘या’ भागांत आज व उद्या पाणीपुरवठा बंद राहणार !

नाशिक। दि. ६ जुलै २०२५: महापालिकेतर्फे तांत्रिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील काही भागात आज व उद्या पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

बुधवारी सिडकोचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. गुरुवारी प्रभाग क्रमांक १ मधील म्हसरूळ तसेच अन्या परिसरामध्ये पाणी येणार नाही. पवननगर जलकुंभाकडे जाणारी ६०० एमएम व्यासाची राइजिंग मेन उंटवाडी पुलाजवळ फुटल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा बुधवारी (दि. ६) सकाळी १० वाजेपासून सायंकाळपर्यंत बंद राहणार आहे. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणी येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

तर पंचवटीच्या प्रभाग एकमधील एस्सार जलकुंभ भरणारी ऊर्ध्ववाहिनी दिंडोरीरोड, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राच्या उत्तर बाजूच्या गेट समोर कॅनॉलमध्ये जलवाहिनीचे काम गुरुवारी (दि. ७) होणार आहे. त्यामुळे गजपंथ सोसायटी, रामचंद्रनगर, वडजे मळा, म्हाडा कॉलनी, कलानगर, प्रसादनगर, विजयनगर, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, साईनगर, राजमाता मंगल कार्यालयापर्यंत तसेच देवधर कॉलेज, विनायकनगर, मधुर स्वीट परिसर, उमिया माता मंदिर परिसर, गोरक्षनगर या परिसरात पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790