पीएमपी( PMP) आजाराने ग्रस्‍त रुग्‍णावर अपोलो हॉस्पिटल्स, नाशिकमध्ये गुंतागुंतीची शस्रक्रिया यशस्‍वी !

नाशिक। दि. ९ ऑगस्ट २०२५: स्यूडोमिक्सोमा पेरिटोनी (पीएमपी) या दुर्मिळ आजाराने ग्रस्‍त ६६ वर्षीय रुग्‍णाच्‍या पोटात पाणी साठल्‍याने सतत पोट फुगत असल्‍याची तक्रार होती. या रुग्‍णावर नाशिकच्‍या अपोलो हॉस्‍पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्रक्रिया करताना व त्‍या पश्‍चात औषधोपचारातून यशस्‍वी उपचार केले आहेत. त्‍यामुळे रुग्‍णाला दिलासा मिळाला आहे. अपोलो हॉस्‍पिटलच मधील कर्करोग शस्रक्रिया तज्ञ डॉ.अंबरीश चॅटर्जी यांच्‍या नेतृत्‍वाखाली टीमने परीश्रम घेतले.

याबाबत अधिक माहिती देताना कर्करोग शस्रक्रिया तज्ञ डॉ.अंबरीश चॅटर्जी म्हणाले ”६६ वर्षीय रुग्‍णाच्‍या पोटात पाणी साठत असल्‍याची समस्या होती. प्रारंभी त्याला क्षयरोगाची लक्षणे असल्याच्या अनुषंगाने रुग्‍णावर बाहेरच्या डॉक्टरांनी क्षयरोगाचे उपचार सुरु केले, परंतु आठ महिने उपचार घेतल्‍यानंतर देखील त्‍याला दिलासा नव्हता. त्यानंतर मी जेव्हा रुग्णाची सगळी लक्षणे ऐकून घेतल्यावर लक्षात घेता हा त्रास कदाचित कर्करोगामुळे होत असल्याचा अंदाज मला आला. अपोलो हॉस्‍पिटलमध्ये या रुग्‍णाच्‍या आवश्‍यक तपासण्या केल्‍या आणि दुर्बिणीच्या साह्याने एन्डोस्कोपी केली असता, अपेंडिक्सच्या जवळ कर्करोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

या आजाराला वैद्यकीय भाषेत स्यूडोमायक्सोमा पेरिटोनी (पीएमपी) असे म्हणतात. या कर्करोगाच्‍या उपचारात शस्रक्रिया हा एकच पर्याय उपलब्‍ध असतो , हि अतिशय गुंतागुंतीची शस्रक्रिया सुमारे १७ तास चालली , रुग्‍णाचे वय आणि इतर गोष्टी लक्षात घेता शस्रक्रिया आव्‍हानात्‍मक होती. परंतु हॉस्‍पिटलमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या सुविधा, डॉक्‍टरांचे कौशल्‍य यामुळे कुटुंबियांनी शस्रक्रियेसाठी तयारी दर्शविली व या रुग्णाची सायट्रेडक्टिव्ह सर्जरी (Cytoreductive surgery) आणि हायपेक (HIPEC) करण्याचा निर्णय घेण्यात आला.या रुग्णाला पीएमपी (PMP)हा दुर्मिळ आजार होता याला अपेंडिसियल म्यूनिस ट्यूमर (Appendiceal mucinous tumor) असे देखील संबोधले जाते. अंडाशय, मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा हा आजार उद्‌भवू शकतो. हा घटक जेलीसारखा दिसतो. शेंबडा सारखे असे म्युसिन हे चिकट द्रव्य ओटी पोटात जमा झाल्याने लक्षणे जाणवू शकतात. आजाराच्‍या प्रमुख लक्षणांमध्ये पोटात सतत दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब अशी लक्षणे सामान्‍यतः दिसतात.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

वजन कमी होणे, भूक न लागणे अशाही आरोग्‍याच्‍या तक्रारी उद्‌भवू शकतात. स्कॅन किंवा अपेंडिक्सिस प्रक्रियेदरम्‍यान या आजाराचे निदान होऊ शकते. सिटीस्कॅन (CT Scan), एमआरआय (MRI) किंवा पेट स्कॅन (Pet Scan) , बायोप्सी लॅप्रोस्कोपीद्वारे या ट्यूमरची शस्रक्रिया केली जाते. हायटेक शस्रक्रिया झाल्यानंतर पोटात ठराविक तापमानात केमोथेरपी देण्यात येते हा देखील उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो. सुमारे १७ तास ही शस्रक्रिया चालली आणि यशस्वी झाली,त्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रुग्णाच्या फुफुसाला संसर्ग झाला असल्‍याने पुढील काही दिवस मुक्‍काम वाढला पण अतिदक्षता विभागातील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णावर योग्य उपचार सुरु ठेवले आणि रुग्ण्याची तब्येत पूर्ण बरी झाल्यावर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

अपोलो हॉस्पिटल्स चे युनिट हेड अजीत झा म्हणाले “हि शस्रक्रिया सुमारे १७ तास चालली यात कर्करोग शस्रक्रिया तज्ञ डॉ.अंबरीश चॅटर्जी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. सोहम दोशी आणि भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते हे सहभागी होते आणि यांनी हि अतिशय गुंतागुंतीची शस्रक्रिया यशस्वी केली त्यानंतर अति दक्षता विभागातील डॉ. प्रवीण ताजणे, डॉ.अतुल सांगळे, डॉ. अमोल खोलमकर, डॉ.तुषार खैरे ,डॉ मृणाल चौधरी आदी तज्ञ डॉक्टरांनी रुग्णावर शस्रक्रियेनंतर योग्य उपचार केले आणि रुग्ण पूर्ण बरा झाला या बद्दल मी सर्व डॉक्टरांचे अभिनंदन करतो, अपोलो हॉस्पिटल्स नाशिक मध्ये उपलब्ध असलेले सुसज्ज ऑपरेशन थेटर,पायाभूत सुविधा, कुशल आणि अनुभवी डॉक्टर्स, प्रगत तंत्रज्ञान , प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि सर्वोत्तम अतिदक्षता विभाग आणि त्यात कार्यरत असलेले तज्ञ डॉक्टर्स या सगळ्यामुळे अश्या प्रकारच्या अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्रक्रिया यशस्वी होतात आणि रुग्णाला इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here