
नाशिक। दि. ३ ऑगस्ट २०२५: कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १३ गोवंशची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सामनगाव येथे ही कारवाई केली. लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरेशी (रा. सिद्धार्थनगर सामनगाव) असे या संशयिताचे नाव आहे. शेडमधून ३ लाख ६५ हजारांचे १३ गोवंश मिळून आले.
पथकाचे उत्तम पवार यांना माहिती मिळाली. सामनगाव येथे पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल करीता गोवंश डांबून ठेवले आहे. पथकाने परिसरात सापळा रचला. एक इसम संशयास्पद फिरत असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेतले चौकशी केली. शेड मध्ये असलेल्या गोवंशची माहिती घेतली असता कत्तलसाठी
ठेवल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, चेतन श्रीवंत, महेश साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश संगोपनाकरिता गो शाळेत सोडण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
![]()

