मुंबई। दि. ३० जुलै २०२५: मान्सूनच्या मध्यपर्यंत वरुणराज भारतात धो-धो बरसला. परंतु आता वरुणराजा १५ दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
दरम्यान, हवामान विभागानुसार,भारतात सामन्या पेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झालाय. खरीप पिकांसाठी हे चांगलं आहे. एक जुलै ते २८ जुलैदरम्यान देशात साधारण ४४०.१ मिमी पाऊस झालाय. देशातील सर्व भागात चांगला पाऊस झालाय. याचदरम्यान हवामान विभागाने मान्सून बाबत नवी अपडेट दिलीय. आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढणारा पाऊस सुट्टीवर जाणार आहे. हवामान बदलामुळे पाऊस मोठ्या सुट्टीवर जाणार आहे.
वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे पाऊस १५ ऑगस्टनंतरच जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. संपर्ण राज्यभरात अशीच स्थिती राहणार आहे. मात्र ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पडणारा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडटात पडत असतो, असं हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितलंय.
दरम्यान येत्या रविवारपर्यंत मुंबईत ऊन-पावसाचा खेळ रंगणार आहे. तर १५ ऑगस्टपर्यंत हलका, तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा तसेच साताऱ्याच्या घाटमाथ्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल.
तर अकोला, अमरावती,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोदिंया, नागपूरमध्ये ढगाच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि हलका स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज देण्यात आलाय.
तर उद्याही विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. गुरुवारपासून विर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे .
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790