नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) ८७८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २०७६, एकूण कोरोना रुग्ण:-४८,७७८, एकूण मृत्यू:-७०४ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- ४४,५७४, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३५०० अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)म्हसरूळ,दिंडोरी रोड,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) सिडको, नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) ईश्वर प्रेस्टिज, सेरीना मेडोज, गंगापूर रोड नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) ११, तृप्ती निवास, सद्गुरु नगर,त्रिकेश सोसायटी, नाशिकरोड येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) गुरुवर्य, कोणार्क नगर, आडगाव पेट्रोल पंप येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) २, गुरु सरिता रो हाऊस, चंपानगरी,कॅनॉल रोड, जेल रोड, नाशिकरोड येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ७) ५, कला निकेतन सोसायटी, धोंगडे नगर, दत्त मंदिर, नाशिक येथील ८५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) अमृत नगर, पंचक, जेलरोड येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९) डीजीपी नगर, सिडको, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. १०) चेतना नगर, सेंट फ्रान्सिस स्कूल येथील ७१ वर्षीय पुरुष वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.