नाशिक। दि. 3 जुलै, 2025: नाशिक जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक, वीरपत्नी व इतर नागरिकांनी 15 जुलै 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल विलास सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असा आहे पद तपशील:
सैनिक मुलांचे वसतिगृह, नाशिक साठी
👉 चौकीदार: 1 पद (पुरूष) रूपये 20 हजार 886 मानधन
👉 स्वयंपाकी: 3 पदे (महिला) रूपये 13 हजार 924 मानधन
👉 सफाई कामगार: 1 पद (पुरूष) रूपये 13 हजार 89 मानधन
सैनिक मुलींचे वसतिगृह, नाशिक साठी
👉 स्वयंपाकी: 2 पदे (महिला) रूपये 13 हजार 924 मानधन
👉 सफाई कामगार: 1 पद (पुरूष) रूपये 13 हजार 89 मानधन
👉 माळी: 1 पद (महिला) रूपये 13 हजार 89 मानधन
याबाबत अधिक माहितीसाठी 0253-2970755 या दूरध्वनीवर अथवा 9421498139 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.