नाशिक: मोबाइलवर बोलताना गच्चीवर गेला; तोल जाऊन पडल्याने युवक ठार

नाशिक। दि. २० जून २०२५: बोलता बोलता गच्चीवर गेला, पण तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जेलरोड सैलानी बाबासमोरील ओमनगर तुलसी अपार्टमेंटमध्ये ही घटना बुधवारी घडली.

विवाहित युवक वीरेंद्रकुमार रामनारायण कुमार यादव (वय २७) हा मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास गच्चीवर मोबाईलवर बोलत असताना खाली जमिनीवर पडला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता पहाटे त्याचे निधन झाले. वीरेंद्रकुमारला दोन लहान मुले आहेत. वीरेंद्रकुमार मूळ उत्तर प्रदेशमधील लखनौचा असून तो नाशिकला इमारत रंगरंगोटीचे काम करतो. (उपनगर पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: १०८/२०२५)

Loading

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790