नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बाजारपेठ परिसर तसेच नागरी वस्तीमध्ये सार्वजनिक स्वच्छता राहावी याकरीता महानगरपालिकेने विविध ठिकाणी नागरीकांच्या सुविधेसाठी स्वच्छता गृहाची निर्मिती केलेली आहे. सदरचे स्वच्छतागृह ब-याच अंशी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरीकांच्या मोठया प्रमाणावर तक्रारी येत आहे.
नाशिक शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह हे स्वच्छ व दुर्गंधी विरहीत रहावे या करीता एस.ॲन्ड एम. ट्रेडींग कॉरपोरेशनचे प्रतिनिधी मंगेश गांधी यांनी त्यांच्या संस्थेने तयार केलेले पाण्याचे प्रेशर मशिनव्दारे अशी स्वच्छतागृहे योग्य पध्दतीने स्वच्छ कशी ठेवता येईल याचे प्रात्याक्षिक सी.बी.एस. जवळील सार्वजनिक स्व्चछतागृह येथे दाखविण्यात आले. या प्रसंगी नाशिकचे महापौर सतिश नाना कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे, विभागीय स्वचछता निरिक्षक पी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
अशा प्रकारच्या पाणी प्रेशर मशिनव्दारे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे हे आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा उभारुन स्वच्छ केल्यास शहराचे सार्वजनिक आरोग्य निश्चितच अबाधीत राहण्यास मदत होउन नाशिक शहराचा स्वच्छ भारत अभियान मध्ये प्रथम क्रमांक येण्यास मदत होईल असे सुतोवाच महापौरांनी केले आहे.