नाशिक। दि. १५ जून २०२५: प्रेमसंबंध असलेल्या युवतीला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत दुसऱ्या युवतीसोबत लग्न ठरवत फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने जाब विचारण्यास गेलेल्या युवतीला संशयिताच्या आई-वडिलांनी दोषी ठरवत मारहाण केली.
युवतीने संशयितांच्या घरातल्या बाथरूममधील काहीतरी विषारी औषध पिऊन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संशयित प्रियकर व त्याच्या आई वडिलांविरोधात भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित अमीर पठाण याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. लग्नाचे आमिष देत शालिमार येथील हॉटेलमध्ये नेत शारीरिक संबंध केले. प्रेमसंबंध सुरू असताना संशयिताने दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरविल्याचे युवतीच्या लक्षात आले. तिने कोपरगाव येथील संशयित पठाणच्या घरी जाऊन विचारणा केली असता संशयिताचे आई-वडील आणि भाऊ यांनी युवतीला दोषी ठरवत मारहाण केली. पोलिसांत तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २२३/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790