
नाशिक | ९ जून २०२५ : नाशिक गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने एक मोठी कारवाई करत ५४ लाख ८४ हजार २६७ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक कंटेनर व चालकाला अटक करण्यात आली असून, हा माल धुळे येथून कसारा येथे विक्रीसाठी नेला जात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार, अवैध अन्नपदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस अंमलदार संदीप भांड आणि विशाल देवरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एमएच ०३ सीपी ६२७९ या क्रमांकाच्या टाटा कंटेनरमधून प्रतिबंधित गुटखा धुळे येथून कसारा येथे जात आहे. मिळालेल्या माहितीवरून मिनाताई ठाकरे स्टेडियमजवळ सापळा रचून कंटेनर थांबवण्यात आला. झडती दरम्यान कंटेनरमध्ये रु. २८,५४,२६७/- किमतीचा गुटखा व पानमसाला सापडला.
कंटेनर चालकाची ओळख विजय तानाजी तुपे (वय २९, रा. तुपेवाडी, सांगली) अशी असून, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने धुळे येथून गुटखा आणल्याची कबुली दिली. तो गुटखा कसारा येथे विक्रीसाठी नेला जात होता.
या कारवाईत वापरलेला कंटेनर (किंमत सुमारे २६ लाख) आणि प्रतिबंधित माल असे एकूण रु. ५४,८४,२६७/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव पोलीस, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार: प्रविण वाघमारे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, रमेश कोळी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार: अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे यांच्या पथकाने केली आहे.
![]()

