नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट; हवामान खात्याचा इशारा

नाशिक | दि. ७ जून २०२५: नाशिकसह मध्य महाराष्ट्रात आज (शनिवार) हवामान खात्याने पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागांमध्ये कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाला अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, या भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. राज्यात पुढील दोन दिवस कोकण भाग वगळता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात काही भागांत जोरदार सरींची शक्यता असून, ९ जून रोजी मराठवाड्यातच पावसाचे प्रमाण अधिक असू शकते.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

दरम्यान, अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्यात हलकासा पाऊस व उन यांच्यात लपंडाव सुरू आहे. पुणे शहरात सकाळच्या सुमारास कडक ऊन पडत असून, दुपारनंतर पावसाची संततधार अनुभवायला मिळत आहे. हवामानातील या बदलाचा आरोग्यावरही परिणाम होत असून, सध्या सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here