नाशिक: ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट २ कडून अटक !

नाशिक। दि. ६ जून २०२५: शहरातील सातपूर परिसरात वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांमुळे सतर्क झालेल्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मोठी कारवाई केली असून, दोन सराईत चोरट्यांना पांडवलेणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांची नावे प्रदीप तुपे (रा. राजदूत हॉटेलमागे, नाशिक) आणि योगेश बाळू लोखंडे (रा. वणी) अशी आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दोघांकडून चोरीची एक रिक्षा जप्त केली आहे. या अटकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील इतर रिक्षा चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरीच्या वारंवार होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघे संशयित चोरटे ओळखले गेले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे दोघे पांडवलेणी परिसरातील एका हॉटेलजवळ येणार असल्याचे निष्पन्न झाले.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

त्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, विलास गांगुर्डे आणि चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने सापळा रचत ही कामगिरी पार पाडली. तपासादरम्यान दोघांनी रिक्षा चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे शहरातील अन्य चोरींचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here