नाशिक: पंचवटीतील १९ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी आरोपी जेरबंद !

नाशिक, दि. २९ मे २०२५: पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी घडलेल्या खून प्रकरणात अवघ्या दोन तासांत संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

२८ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गाडगे महाराज पुलाजवळील बुधवार बाजार येथे जगत रामविलास दास हे आपल्या मुलासह भाजी खरेदी करत असताना, चार अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पैशांसाठी त्यांनी खिशात हात घालताच दास आणि त्यांचा मुलगा नंदलाल ऊर्फ सूरज दास यांनी विरोध केला. यावेळी हल्लेखोरांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि एका तरुणाने धारदार शस्त्राने नंदलाल ऊर्फ सूरजच्या पोटात वार करून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जगत रामविलास दास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला (गु.र.क्र. 261/2025) आणि तत्काळ तपास सुरू करण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक सक्रिय झाले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, संशयित आरोपी साहिल ऊर्फ डोकोमो दशरथ गायकवाड (वय: २०) तसेच शुभम ऊर्फ ब्लॅकी रामदास सोनवणे (वय: २०) व दोन विधी संघर्षित बालक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपी पंचवटीतील अवधूतवाडी, फुलेनगर भागात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, अमोल काळे, जयवंत लोणारे, पोलीस अंमलदार: कुणाल पचलोरे, अंकुश काळे, विनोद चितळकर, वैभव परदेशी, योगेश वायकंडे यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790