नाशिक: वर्षभरात ९५ आरोपी आले गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात

नाशिक (प्रतिनिधी) : शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत गुंडाविरोधी पथकाने एप्रिल-२०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये हवे असलेले सुमारे ९५ आरोपींना गुंडाविरोधी पथकाने जाळ्यात घेतले आहे. यामध्ये १२ गुन्हेगारांना माग थेट परराज्यापर्यंत काढून त्यांना शिताफीने हुडकून काढण्यास या पथकाला यश आले आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयांतर्गत साध्या गणवेशात कार्यरत राहणाऱ्या गुंडाविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. गुन्हे शाखेचे नियंत्रण असलेल्या या पथकातील अधिकारी, अंमलदारांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेले संशयित आरोपींना शोधून आणण्याचे आव्हानात्मक ‘टास्क’ दिले जाते.

पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, प्रवीण चव्हाण, भुषण सोनवणे, अशोक आघाव, सुनिता कवडे आदींनी गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे मंगळवारी (दि.२७) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कौतुक करत प्रशस्तीपत्र देत गौरव केला. याप्रसंगी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आदी उपस्थित होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

👉 शहरातून अटक केलेले आरोपी – ६७
👉 नाशिक जिल्ह्याबाहेरून अटक केलेले आरोपी – १६
👉 परराज्यातून अटक केलेले आरोपी- १२
👉 शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई -१२
👉 प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई-०९

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790