नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागेच्या १०० कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहे. मात्र या प्रकरणाचे पाऊल वेगळ्याच दिशेला जायला लागले असून शहा परिवारातील सदस्यांना पाठवलेली नोटीस या घोटाळ्याचा महत्वाचा पुरावा ठरत असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभ यांनी नोटीस दिल्याची फाईलच गायब आहे.
मंगळवारी (दि.२२) महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना गटनेता विलास शिंदे आणि याप्रकरणाविषयी याचिका दाखल करणारे वकील शिवाजी सहाणे हे चौकशी समितेचे अध्यक्ष मनोज घोडे-पाटील यांच्याकडे शहा कुटुंबातील सदस्य स्नेहा यांना पाठवलेल्या नोटीस संदर्भात माहिती मागितली असता त्यावेळी फाईल गायब असल्याचे समिती अध्यक्षांकडून सांगण्यात आले. असे चौकशी समितीच्या सदस्यांनी सांगितल्याने याप्रकरणातून संबंधीतांचे धाबे दणाणले असून संशय बळावला जात आहे.