नाशिक: शहरात पावसाचे धुमशान; विविध भागात झाडे कोसळली

नाशिक | १२ मे २०२५: नाशिक शहरात रविवारी (११ मे) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात सुमारे तासभर शहराला झोडपून काढले. दुपारी २:४५ ते ३:३० या दरम्यान ताशी २५ ते ३० किमी वेगाने वारे वाहत होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जात पडताळणीची 4 जुलैपर्यंत विशेष मोहीम

या वाऱ्यामुळे सिडको, सातपूर तसेच मध्यवर्ती भागात अनेक झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहनांचेही नुकसान झाले. सातपूरमधील गोरक्षनगर परिसरात काही घरांवरील पत्रे उडून गेली असल्याची माहिती आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १० लाखांच्या रोख रकमेसह फरार झालेला ड्रायव्हर त्याच्या साथीदारासह गजाआड !

शहरात एकूण ५० पेक्षा अधिक झाडे पडल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे. प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, जनतेला आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पीएफवर व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790