
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील पेठरोडवरील फुलेनगर भागात अचानकपणे गुन्हेगारांविरुद्ध कोम्बिंग ऑपरेशन गुरुवारी (दि.८) रात्री ८ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत ही मोहिम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत सुमारे ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली तसेच ४२ सराईताना ताब्यात घेत सखोल चौकशी करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन पोलिसांचा वचक वाढावा जेणेकरून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पोलिस निरिक्षक मधुकर कड, संतोष नरुटे, अंकुश चिंतामण, समाधान चव्हाण, हेमंत तोडकर आदींसह गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२, तसेच सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली, उपनगर, म्हसरुळ, मुंबईनाका, सातपूर, गंगापूर, अंबड, देवळाली कॅम्प, नाशिकरोड या सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी मिळून सुमारे ३०० पोलिसांचा फौजफाटा फुलेनगरमध्ये अचानकपणे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास येऊन धडकला.
या मोहिमेत एकूण ८० पेक्षा जास्त पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. फुलेनगर पोलिस चौकी परिसरात त्यांना आणून बसविण्यात आले. सुमारे तीन तास हा संपूर्ण परिसर तीनशेपेक्षा जास्त पोलिसांकडून पिंजून काढण्यात आला.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790