🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: टोळक्याच्या सशस्त्र हल्ल्यात रिक्षाचालक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): किरकोळ कारणावरून अशोकनगर भाजी मार्केट परिसरात रिक्षाचालकावर दुचाकीस्वार टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करीत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी घडली. या हल्ल्यात रिक्षाचालक विजय बाळू ओतारी (वय ४०, रा. धर्माजी कॉलनी) हे जखमी झाले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

ओतारी हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच २५ ईएच ३३९७) घेऊन शिवाजीनगरकडून सातपूरच्या दिशेने जात होते. अशोकनगर परिसरात दुचाकीने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. ओतारी यांनी रिक्षा थांबविली असता दुचाकीने ट्रिपलसिट प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांना घेरले. ‘काय रे, रिक्षा चालविता येते का..’ असा सवाल करत शिवीगाळ करत त्यांना मारहाण सुरू केली. यापैकी एकाने त्याच्या कंबरेला असलेला कोयता काढून ओतारी यांच्या पायावर आणि पाठीवर सपासप वार केले. यात ओतारी जखमी झाले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२७/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790