Live Updates: Operation Sindoor

नाशिक: अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी- ललित गांधी

नाशिक, दि. 22 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल नागरी व ग्रामीण क्षेत्रात पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजवाणी व्हावी, अशा सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी बैठकीत दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. गांधी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के, वनप्रकल्प विभाग नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सुमेर काळे , सुमित बोरा, विजय बेदमुथा, संजय सोनवणे ,महेश शहा, प्रकाश बोथरा, ऋषिकेश कोंडेकर, यांच्यासह अधिकारी व जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती; ४२ ताब्यात

गांधी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील जैन सामाजातील प्राचीन तीर्थक्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने यासोबतच जैन साधू व संत हे पायी प्रवास करतात त्यांची मुक्कामासह सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उपयायोजना कराव्यात. यासाठी जागा उलब्धतेसह शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत. अल्पसंख्याक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्री व्यवस्थेसाठी महानगरपालिका क्षेत्रात शाश्वत स्वरूपाची जागा उपलब्ध करून मिळावी. तसेच नाशिक शहर,चांदवड व वणी तालुक्यातील जैन मंदिरांच्या विकासासाठी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात याबाबत समावेश करण्यात यावा, अशा सूचनाही श्री. गांधी यांनी यावेळी दिल्या.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण यावेळी केले.जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी यांनी यावेळी अल्पसंख्याक विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790