नाशिक (प्रतिनिधी): नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत जनता दरबार समिती सभागृह, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, गडकरी चौक, नाशिक येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
नागरिकांच्या तक्रारींची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून ‘म्हाडा’ मुख्यालयात राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाप्रमाणे नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या स्तरावर सभापती रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरा जनता दरबार होईल. मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील गाळेधारक, भूखंडधारक, सदनिकाधारक यांनी आपल्या अडी- अडचणी मांडण्यासाठीचे लेखी निवेदन, अर्ज मंडळाकडे जनता दरबारच्या दिवशी स्वीकारण्यात येतील. जे नागरिक जनता दरबारच्या दिवशी समक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांनी ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत meet.google.com/mia-odnw-vum या लिंकद्वारे सहभागी होऊन समस्या नोंदवू शकतील.
जनता दरबारासाठी अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावीत. न्यायप्रवीष्ट प्रकरणे, राजस्व/अपील, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे, अशा प्रकरणांची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल, तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही मुख्य अधिकारी आवळकंठे यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790