नाशिक: दुचाकीची मागणी करत विवाहितेचा छळ; पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): दुचाकीची मागणी करत आम्हाला मुलगा पाहिजे होता. तुला मुलगी झाली असे बोलून पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये लग्न झाले आहे. पतीसोबत सिडको येथे नांदत असताना पती, सासू-सासरे आणि सासरच्या मंडळींनी ”लग्नात मानपान दिला नाही, तुला घरातील स्वयंपाक व्यवस्थित येत नाही आम्हाला मुलगा पाहिजे होता. मुलगी झाली” असे बोलून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत दमदाटी केली. माहेराहून दुचाकी घेऊन ये, नाही तर पैसे दे. तरच घरात रहा, अशी धमकी देत विवाहितेला घरातून हाकलून दिले. अंबड पोलिसांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790