
नाशिक (प्रतिनिधी): दरोडा, जबरी लूट, जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या म्हस्के टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने संगमनेर, लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी येथे ही कारवाई केली. सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के (२९, रा. भालेराव मळा, जयभवानीरोड) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना उपनगर पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या तयारीच्या गुन्ह्यातील फरार संशयित म्हस्के नाशिकरोडकडून पुण्याकहे पळून गेल्याची माहिती मिळाली. पथकाचे विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, गणेश भागवत यांच्या पथकाने स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने संशयिताचा माग काढला.
पथकाची भनक लागल्याने संशयित दुचाकीने फरार होण्याच्या तयारीत असतांना गुंजाळवाडी परिसरात पाठलाग करत त्याला अटक केली. संशयिताच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात ४ देवळाली कॅम्प मध्ये १ असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयित टोळी बनवून गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आले. उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
![]()


